चंद्रपूर,
summer-chandrapur-vidarbha : चंद्रपूर येथे बुधवारी विदर्भातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. तर ब्रम्हपुरचे 43.8 अंश सेल्सिअस तापमान होते. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा चंद्रपूरचे विदर्भातील हे सर्वाधिक तापमान आहे. इतर भागातही 43 ते 44 अंशाच्या दरम्यान तापमान होते.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार तापमानात सतत वाढत होताना दिसत आहे. बुधवारी चंद्रपूरचे तापमान 45 अंशावर पोहचले. तर त्या खालोखाल गडचिरोलीचे तापमान 44.4, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती 44.2, ब्रम्हपुरी 43.8, यवतमाळ 43.2 वासिम 43.4, भंडारा व गोंदिया 43, बुलढाणा येथे 41.3 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
सूर्य आक ओकत असल्याने दुपारच्या सुमारास शहरातील मार्गावर क्वचितच गर्दी दिसते. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यास सतर्क राहण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आला आहे. गत काही दिवसात दैनंदिन तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम शरीरावर होत असून, योग्य काळजी घेतली नाही, तर उष्माघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे उष्माघात टाळण्यास नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी केले आहे