- युवकावर शस्त्रक्रिया करून दिले जीवदान
- डॉ. अभिनव देशपांडे यांच्या कार्याचा अमेरिकेत गुणगौरव
दिनांक :29-Apr-2026
Total Views |
अनिल फेकरीकर
नागपूर,
dr abhinav deshpande मानवी शरीर चमत्काराने भरलेले आहे. असाच दुर्मिळ प्रकार नागपुरात एका युवकाच्या संदर्भात घडला. त्याच्या हृदयाच्या भोवती गाठ तयार झाली. त्याला गिळणे, श्वास घेणेही कठीण झाले. ती हृदयाभोवतीची गाठ युवकासाठी यमाघरची वाट होती. या स्थितीत मध्य भारतातील प्रख्यात रोबोटिक कॅन्सर सर्जन डॉ. अभिनव यशवंत देशपांडे मदतीला आले अन् त्यांनी युवकाच्या हृदयाभोवती असलेली गाठ लीलया काढून जीवदान दिले. विशेष म्हणजे त्यांनी दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात जो नागपुरात प्रयोग केला, तो चक्क अमेरिकेत चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला.
नागपुरातील एक युवक आजारी पडला. त्याला श्वास घ्यायला आणि गिळायला त्रास व्हायचा. त्याची अवस्था मरणासन्न झाली होती. त्याला डॉक्टरांनी तपासले आणि हृदयाभोवती गाठ असल्याचे निदान केले. पण ही गाठ काढायची कशी, असा विचार त्यांच्यासमोर होता. जटिल आणि जीवघेणी शस्त्रक्रिया असल्याने तेही विचारात पडले. पण युवकाला तर वाचवायचेच म्हणून त्यांनी आपले वैद्यकीय कसब पणाला लावीत नागपुरात मॅक्स हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरीद्वारे हृदयाभोवतीची गाठ काढून यमाघरी जाणाèया युवकाचा जीव खेचून आणला. त्यांनी जी अत्याधुनिक पद्धत अनुसरली तिचे सर्वत्र कौतुक झाले. अमेरिकेतील तज्ज्ञांनी तर याअनुषंगाने त्यांना आमंत्रित करून वैद्यकीय परिषदेत याच विषयावरील पेपर सादरीकरणाचा सन्मान दिला. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाल्यास युवकाच्या रोगाचे निदान काढल्यावर त्याला ‘रोबोटिक एक्टोपिक थायमोमा एक्सिजन मासक्यूराडिंग अॅज पेरिकार्डिअल सिस्ट’ असेही म्हटले जाते.dr abhinav deshpande एक्टोपिक म्हणजे सामान्य जागेऐवजी शरीरात इतरत्र कुठेतरी होणारी गाठ असते. अशा दुर्मिळ प्रसंगी नागपुरातील डॉ. अभिनव यशवंत देशपांडे यांनी जो काही भीमपराक्रम केला तो नक्कीच सर्वांसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.