कोलकाता,
tape-on-evm : पश्चिम बंगालमध्ये आज मतदानाचा दुसरा आणि अंतिम टप्पा पार पडत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी फाल्टा विधानसभा मतदारसंघातील मतदानासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएममधील भाजपला मत देण्याचा पर्याय (बटण) टेपने झाकलेला होता, ज्यामुळे मतदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला आणि पक्षाला मत देणे कठीण झाले.
फाल्टा येथील टीएमसी उमेदवार
अमित मालवीय यांनी या घटनेचे तीन व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहेत. त्यांनी सांगितले की, जहांगीर हे बंगालमधील डायमंड हार्बर येथील फाल्टा विधानसभा मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. फाल्टा विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर ही समस्या उद्भवली आहे.
या मतदान केंद्रांचा उल्लेख
सौजन्य: सोशल मीडिया
भाजप नेते मालवीय यांनी उल्लेख केलेल्या मतदान केंद्रांमध्ये फाल्टा १४४, पार्ट १७०, रूम नं. २ आणि हरिनडांगा हायस्कूल यांचा समावेश आहे. मतदान केंद्र क्रमांक १८९ मध्येही अशीच समस्या असल्याचे वृत्त आहे. अमित मालवीय यांच्या या आरोपांवर राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.