मुंबई
Ambadas Danve राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अंबादास दानवे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, या संदर्भात पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत होते. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या मित्रपक्षांनीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधानपरिषदेवर जावे, अशी आग्रही मागणी केली होती. शिवसेना (उबाठा) गटातील काही नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला होता.
मात्र, सर्व चर्चांना बाजूला सारत Ambadas Danve अखेर पक्षाने अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत त्यांना विधानपरिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.भाजपने यापूर्वीच आपल्या सहा उमेदवारांची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतील हालचालींना वेग आला होता. त्यातच ठाकरे गटाच्या उमेदवारीबाबत सुरू असलेला सस्पेन्स आज संपुष्टात आला. दानवे उद्या सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे महाविकास Ambadas Danve आघाडीच्या रणनीतीला नवे वळण मिळाले असून, आगामी विधानपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.
उद्धव ठाकरेंचे मानले आभार
विधानपरिषदेचे तिकिट मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांनी आनंद व्यक्त केले आहे. उद्धवजींनी सभागृहात जावे अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. पण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मला वाटते. निश्चित मी उद्धव जींचा, पक्षाचा आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराने चालण्याचा आम्ही जो संकल्प केला मला असे वाटते त्याच विचाराचा हा विजय आहे. निष्ठा तर ठेवली पाहिजे. फळ म्हणायला गेलो तर ह्याच्या आधीही मी सभागृहात होतो. विरोधी पक्ष नेता होतो. निष्ठा तर ठेवली पाहिजे. परंतू सामान्य शिवसैनिकाला उद्धवजींनी त्यांची जागा दिली हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.
माध्यमांशी बोलताना अंबादास Ambadas Danve दानवे पुढे म्हणाले की, मी उद्धव साहेबांचे आभार मानतो. आणि पक्षाने, शिवसेना प्रमुख्यांच्या आशिर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. मी ऑलरेडी सभागृहात होतो. एक गॅपकेबाद, एका ब्रेकनंतर पुन्हा येतोय. उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात येतील या चर्चेवर बोलताना दानवे म्हणाले की, मला असं वाटतं उद्धवजींनी एका शिवसैनिकाला सभागृहात जाण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. आमच्या सगळ्यांची भूमिका होता की ठाकरे साहेबांनी सभागृहात यावं. मला असे वाटते उद्धवसाहेबांनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करुन उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.