रेल्वेत आढळला अडीच वर्षांचा चिमुकला

आरपीएफच्या माहितीनंतर चाईल्ड हेल्प लाईनने केली कारवाई

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
वर्धा,
Wardha railway station रेल्वेत पालकाविना अडीच वर्षाचा चिमुकला प्रवास करीत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती तिकीट तपासणीकाला दिली. रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांनी चिमुकल्याच्या पालकाचा शोध घेतला. पण, ते कुठेही मिळून न आल्याने अखेर बालकाला वर्धा रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. पुढील कारवाईसाठी बालकास चाईल्ड हेल्प लाईनकडे सोपविण्यात आले. ही घटना बुधवार २९ रोजी घडली.
 

Wardha railway station 
मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर-अमरावती या रेल्वेत इटारसीनंतर अडीच वर्षीय बालक पालकाविना असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. प्रवाशांनी घटनेची माहिती तिकीट तपासणीकाला दिली. त्यांनी ही माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर धावत्या रेल्वेत बालकाच्या पालकांचा शोध घेण्यात आला. शोध घेऊनही बालकाचे पालक न मिळाल्याने अखेर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांनी बालकास वर्धा रेल्वे स्थानकावर उतरविले. माहिती मिळताच चाईल्ड हेल्प लाईनच्या अधिकार्‍यांनी Wardha railway station वर्धा रेल्वे स्थानकवर बालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. या बालकास बाल कल्याण समितीसमोर हजर करीत पुढील कारवाई सुरू आहे.