वाशीम जिल्ह्याचा पिक विमा योजनेत समावेश करावा

आ. सई डहाकेंचे कृषीमंत्री भरणेंना निवेदन

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड,
crop insurance पिक विमा योजनेत वाशीम जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सई प्रकाश डहाके यांनी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 

Washim district crop insurance demand, 
राज्य शासनाच्या पिक विमा योजनेत वाशीम जिल्हा वगळण्यात आलेला आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. वाशिम जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा असून येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीड व रोग यांच्या संकटांना सामोरे जात आहेत.अशा परिस्थितीत पिक विमा योजना ही शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाची आधारव्यवस्था आहे. मात्र, या योजनेतून वाशीम जिल्हा वगळल्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संरक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी अधिकच वाढत असून त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. या संदर्भात आपण तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पिक विमा योजनेत वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत आवश्यक ती सकारात्मक प्रतिसादाची कार्यवाही करावी असेही पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागच्या वर्षीही शेतकर्‍यांना crop insurance  शासन स्तरावर मदत व्हावी याबाबतचा प्रश्न आमदार सई डहाके यांनी सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून भरपाई मिळाली होती. यावेळीही कृषी मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात आश्वासित केले आहे.