तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
dattatreya-bharane : खासदार संजय देशमुख यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबईच्या मंत्रालयात मंगळवारी भेट घेऊन यवतमाळ जिल्ह्याचा तत्काळ पीकविमा भरपाईत समावेश करावा, तसेच राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर एचटीबीटी कापूस का लावत आहेत, याबाबत सखोल सर्वेक्षण करण्याची मागणी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकèयांचे मोठे नुकसान झाले असून हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी संवेदनशील असल्याने शेतकèयांना तातडीने आर्थिक दिलासा देणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडेही निवेदन देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी एचटीबीटी कापसाचा मुद्दाही मांडण्यात आला. पारंपरिक बीटी कापसामध्ये तण नियंत्रणासाठी मोठा खर्च व मजुरी लागत असल्याने शेतकरी एचटीबीटी कापसाकडे वळत आहेत. एका हेक्टरमध्ये 4 वेळा निंदणासाठी सुमारे 86 हजार खर्च येतो, तर एचटीबीटी कापसातील तणनाशकामुळे हा खर्च सुमारे 6 हजारांपर्यंत मर्यादित राहतो, याकडे कृषीमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
पीक विमा योजनेबाबत बोलताना, गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना विमा कंपन्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याची टीका या शिष्टमंडळाने केली. ‘उंंबरठा उत्पादन’ ठरविण्याची प्रक्रिया पारदर्शक नसल्याने शेतकèयांना योग्य माहिती मिळत नाही. तसेच, पीक विमा योजना हवामान आधारित करण्याची मागणी करत स्वयंचलित हवामान केंद्रांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी शेतकरी संघटनेचे मिलींद दामले, विजय निवल, राजेंद्र झोटींग, दीपक आनंदवार तसेच संपकरी माफदा कृषी केंद्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.