यवतमाळ जिल्ह्याचा पीकविम्यात समावेश करा

विवेक वानखेडे यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
yavatmal-crop-insurance : यवतमाळ जिल्हा पीक विमा योजनेतून वगळण्यात आलेला असून यामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी मंत्रालय मुंबई येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे विखे पाटील कृषी परिषद उमरखेडचे तालुका अध्यक्ष विवेक वानखेडे यांनी केली.
 
 
y29Apr-Vivek-Wankhade
 
वर्ष 2025-26 च्या पीकविमा योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नाही. हा शेतकरी बांधवांवर खूप मोठा अन्याय असल्याची भावना शेतकèयांमध्ये आहे. तरी तत्काळ यवतमाळ जिल्ह्याचा पीकविमा योजनेमध्ये समावेश करून घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
 
 
तसेच जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्यांच्या मनमानीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकèयांच्या उसाचे बिल अजून शेतकèयांपर्यंत पोहोचले नाही. शेतकरी बांधवांकडे लग्नकार्य असल्यामुळे, तसेच खरीप तोंडावर आला आहे.
अशा परिस्थितीत शेतकèयांनी घरगाडा कसा चालवावा, शेतकरी बांधवांनी कारखान्यांना ऊस देऊन चार महिने होऊनसुद्धा शेतकèयांचे पैसे अद्याप त्यांच्या हातात मिळालेले नाहीत, याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी मागणीही विवेक वानखेडे यांनी केली आहे.