तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
naad-tarang-2026-grand-art-festival : यवतमाळ शहरात 3, 4 व 5 मे दरम्यान ‘नाद-तरंग 2026’ या भव्य कलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दारव्हा मार्गावरील लोहारा येथील इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात आयोजित या कलोत्सवात विविध स्पर्धा होणार असून त्यात गायन, वादन, नृत्य व चित्रकलेचा समावेश आहे. या स्पर्धेस राज्यभरातील कलाकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
तिन्ही दिवसांच्या सर्व नोंदणी पूर्ण झाल्या असून आयोजकांनी नवीन नोंदणी बंद केली आहे. प्रत्येक स्पर्धकासाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यंदा प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून ‘यवतमाळ भूषण’ पुरस्कार सुरू करण्यात येत असून, कला व संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाèयांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्पर्धकांसाठी नाश्ता व जेवणाची सुविधा असून, नामांकित परीक्षकांकडून परीक्षण होणार आहे. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या कलोत्सवाच्या माध्यमातून यवतमाळकरांना तीन दिवस गायन, वादन आणि नृत्याची मेजवानीच अनुभवायला मिळणार आहे.
कलोत्सवाचे आयोजन समर्थ संगीत अकादमीच्या संचालक उषा मंगेश आकळे तसेच कलासाधना बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष प्रेमकुमार निनगुरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.