दोन अल्पवयीन बहिणींचा बालविवाह उधळला

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
सिंदीविहिरी ग्रापं हद्दीतील प्रकार
 
कारंजा (घा.), 
Child marriage बालविवाह करणे व लावून देणे हा कायद्याने गुन्हा असला तरी आजही गावखेड्यात बालविवाह होताना दिसत आहे. तालुयातील सिंदीविहिरी ग्रामपंचायत हद्दीतील एका गावापासून शेतात राहणार्‍या कुटुंबातील १४ आणि १५ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींचा बालविवाह लावून देत असल्याची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने कारवाई करून हा बालविवाह उधळून लावला.
 
 
Child marriage
 
कारंजा तालुयातील एका शेतात राहणार्‍या कुटुंबाने दोन अल्पवयीन बहिणींचा शुक्रवार ३ रोजी विवाह आयोजित करण्यात आला होता. एक बालिका १४ तर दुसरी १५ वर्षांची आहे. ही माहिती चाईल्ड हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांना मिळाली. माहितीची पडताळणी करून त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांना ही माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनात कारंजाचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन यांच्यासोबत समन्वय साधून थेट घटनास्थळी जाऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायत सिंदिविहिरीचे अधिकारी व कर्मचारी, तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी सचिन शिंदे यांच्यामार्फत बालिकांच्या पालकांकडून विवाह थांबविण्याबाबतचा जबाबनामा लिहून घेण्यात आला.
 
 
Child marriage  सदर कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, चाईल्ड हेल्पलाइनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक आशिष मोडक व संरक्षण अधिकारी नितीन जुगनाके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत कारंजा पोलिस स्टेशनचे निलेश मैदपवार, मंगेश निलके, समाधान पांडे, चाईल्ड हेल्पलाइनच्या समुपदेशक माधुरी शंभरकर, अंगणवाडी सेविका सविता इवनाथे, ग्रामीण समस्या मुती ट्रस्टच्या माधुरी थूल व वैभव भांदककर, पोलिस पाटील मारोती ठोले व आशा वर्कर ललिता भारंगे यांचा सहभाग होता.