तरुण भारत इम्पॅक्ट
अनिल कांबळे
नागपूर,
403 police constables promoted पाेलिस उपनिरीक्षक पदावर पदाेन्नतीच्या कक्षेत असलेल्या राज्यातील पाेलिस हवालदारांना गुरुवारी पदाेन्नती देण्यात आली. एकाच वेळी 403 पाेलिस हवालदार थेट पाेलिस उपनिरीक्षक झाले असून गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे राज्यभरात आनंद पसरला आहे. पाेलिस हवालदारांच्या पदाेन्नतीच्या प्रश्नासाठी ‘तरुण भारत’ने पाठपुरावा केला हाेता, हे विशेष.राज्यात पाेलिस अधिका-यांच्या शेकडाे जागा रिक्त असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ताण पाेलीस अधिकाèयांवर वाढला हाेता. त्यामुळे पाेलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील 403 पाेलिस हवालदारांना पाेलिस उपनिरीक्षक पदावर पदाेन्नती दिली.

राज्य पाेलिस दलात उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पाेलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाèयांच्या शेकडाे जागा रिक्त आहे. त्यामुळे उपलब्ध पाेलिस अधिकाèयांवर कायदा व सुरक्षेबाबत ताण येत हाेता. तसेच एकाच अधिकाèयांकडे अनेक गुन्ह्यांचा तपास देण्यात येत असल्यामुळे अधिका-यांमध्ये नाराजीचा सूर हाेता. महासंचालक कार्यालयातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे पदाेन्नत्या रखडल्या हाेत्या. ‘तरुण भारतने’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्याची पाेलिस महासंचालक कार्यालयाने दखल घेऊन गुरुवारी 2013 अर्हता परीक्षा उत्तीर्ण 403 हवालदारांना पाेलिस उपनिरीक्षक पदावर पदाेन्नती दिली. बहुप्रतीक्षित पदाेन्नतीची यादी जाहीर झाल्यामुळे राज्यभरातील पाेलिस कर्मचाèयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कर्मचा-यांमध्ये नवचैतन्य
गेल्या तीन महिन्यांपूर्वीच पाेलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली हाेती. त्यामुळे पीएसआय दर्जाच्या अधिकाèयाला लागणारी वर्दी, कॅप, शूज व इतर तर साहित्य घेऊन ठेवले हाेते. परंतु, पदाेन्नतीस विलंब हाेत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला हाेता. आता महासंचालक कार्यालयाने सकारात्मकता दाखवून पदाेन्नतीची यादी जाहीर केली. त्यामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया आयुक्तालयातील एका पाेलिस हवालदाराने दिली.
हवालदारांना तात्काळ कार्यमुक्त करा
गुरुवारी बदल्या करण्यात आलेल्यांनी बदली आदेशाची प्रत संबंधित वरिष्ठ पाेलिस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहे. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग हाेणार नाही याची पाेलिस अधिकाèयांनी दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.