आबासाहेब आडे यांना भावपूर्ण अभिवादन

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
संस्कारांचा शतकपूर्ती प्रवास

उमरखेड, 
Abasaheb Aade कै. मधुकर उर्फ आबासाहेब आडे (आबा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित स्मृतिसोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाला. कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी एकत्र येत त्यांच्या स्मृतींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली. कल्याणीनगर येथील लिक्सिया प्रीमिअर हॉटेलमधील आयरिस बॅन्क्वेट हॉल येथे दिनांक २१मार्च रोजी दुपारी ११.३० ते ३ या वेळेत हा सोहळा पार पडला. या कार्यक‘माचे आयोजन दिलीप आडे, ज्योती दीपक आडे, संध्या पाठक, अलका पसारकर आणि उल्का कुरुंदकर यांनी केले होते.
 
 
baba saheb
 
याप्रसंगी कै. मधुकर आडे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. उमरखेड उच्च शिक्षित व्यक्तिमत्त्व असलेल्या त्यांनी १९६० च्या दशकात श्री चित्र मंदिर या नावाने सिनेमा थिएटर उभारून सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर घातली होती. या थिएटरचे भूमिपूजन सहकार महर्षी कै. जेठमलजी माहेश्वरी यांच्या हस्ते झाले होते. पुढे त्यांनी या थिएटरचे नाव वसंत टॉकीज असे ठेवले.
 
 
Abasaheb Aade  त्यांनी केवळ सिनेमा क्षेत्रातच नव्हे तर कंत्राटदार म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. टेकडीवरील जगदंबा माता मंदिराच्या पायर्‍यांचे बांधकाम तसेच टुरिंग टॉकीज, लॉजिंग-बोर्डिंग व्यवसायातून त्यांनी प्रामाणिक व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवला. आपल्या दोन मुलांना व तीन मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांनी कुटुंबाला सक्षम पाया दिला. त्यांच्या संस्कारांची हीच फलश्रुती आज त्यांच्या मुलं, मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पंतवंडे यशस्वी वाटचालीतून दिसून येते. कार्यक‘मादरम्यान अनेक नातेवाईक आणि कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. संपूर्ण सोहळा हा आठवणी, कृतज्ञता आणि अभिमान यांचा सुंदर संगम ठरला.