आर्णी,
Alumni gathering at Bharati College स्व. राजकमल भारती कला, वाणिज्य व सुशीलाबाई रा. भारती विज्ञान माजी विद्यार्थी मेळावा समिती व आय.क्यू.ए.सी.च्या वतीने माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून माजी विद्यार्थी दिग‘सच्या बुटले कॉलेजचे प्रा. डॉ. दीपक निलावार, तर प्रमुख वक्ता म्हणून माजी विद्यार्थी कार्यकारिणीचे सदस्य प्रा. विकास राठोड अकोला हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य, तथा संस्थेचे संचालक शशिकांत वानखडे व आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रशांत आवते होते. माजी विद्यार्थी सदस्य म्हणून प्रा. कल्पना मुरादे ग‘ंथपाल वरिष्ठ महाविद्यालय, शिरपूर, रुपेश काटकर शिक्षक तळेगाव दाभाडे, प्रशांत कदम, अतुल इंगळे, संगीत शिक्षक सचिन मार्कंड, आतिश जाधव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य कैलास चव्हाण उपस्थित होते.
Alumni gathering at Bharati College कार्यक‘मासाठी संस्थासचिव सिद्धार्थ भारती कोषाध्यक्ष प्रियदर्शन भारती यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. वक्ते प्रा. विकास राठोड यांनी आपल्या महाविद्यालयात मिळालेले शिक्षण आणि प्राध्यापकांनी दिलेल्या मार्गदर्शनानेच मी माझ्या जीवनात इंग‘जी विषयाचा प्राध्यापक होऊ शकलो याचे सर्व श्रेय माझ्या गुरुजनांना जाते असे विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले. प्रा. कल्पना मुरादे, रुपेश काटकर, आतिश जाधव यांनी आपले व्यक्त केले. कार्यक‘माचे अध्यक्ष डॉ. दीपक निलावार यांनी माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपले व्यक्तिमत्व साकार होत असते असे सांगितले. प्रास्ताविक डॉ. प्रशांत आवते यांनी, संचालन प्रा. उदयसिंग चव्हाण व आभार प्रा. अस्मिता वानखडे यांनी मानले. कार्यक‘माला माजी विद्यार्थी मेळावा समितीचे अध्यक्ष प्रा. सदानंद बोळे, सदस्य डॉ. प्रफुल डॉ. प्रतीक वानखडे, डॉ. विजय टोकसे, प्रा. अमित बागडे, प्रा. चंद्रशेखर खाडे, प्रा. आदर्श चोरडिया, प्रा. धीरज राठोड, प्रा. श्रीकांत धोपे, प्रा. शुभम चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या माजी विद्यार्थी मेळाव्याला ११७ माजी विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या सं‘येने उपस्थित होते.