नाशिक
Harshvardhan Kharat भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक एसआयटी अहोरात्र प्रयत्न करत आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक गेले असता ती पथकाला सापडली नाही. यावेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. एसआयटीने त्याची कसून चौकशी केली. मात्र, या चौकशी दरम्यान हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांना "सर्व काही डॅडलाच माहिती आहे" असे उत्तर देत माहिती देण्याचे टाळले. असे असले तरी, घरामध्ये मोठ्या प्रमाणात 'कॅश' येत असल्याची महत्त्वपूर्ण कबुली त्याने दिल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
एसआयटीने Harshvardhan Kharat हर्षवर्धनवर प्रश्नांची सरबत्ती केली असता, त्याने एक धक्कादायक माहिती दिली. "घरामध्ये रोख रक्कम मोठ्या प्रमाणात येत होती," असे त्याने पोलिसांना सांगितले. हर्षवर्धनच्या या कबुलीमुळे अशोक खरात केवळ जमीन फसवणूक आणि सावकारीच नाही, तर 'हवाला रॅकेट' देखील चालवत असावा, असा संशय आता पोलिसांना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घरात कोठून येत होती? आणि ती कोणाला दिली जात होती? याचा तपास सुरु आहे. तर इतर गोष्टीत खरातच्या मुलाने पोलिसांना माहिती दिली नाही. 'सर्व डॅडला माहिती', असे सांगत त्याने माहिती देण्यास नकार देत आढेवेढे घेतल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, Harshvardhan Kharat शिर्डीतील 4 एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देऊन, सावकारी पाशात ओढून जमीन बळकावल्याचा आरोप खरात कुटुंबावर आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे. एसआयटीचे पथक अशोक खरातच्या घरी गेले असता त्याची पत्नी कल्पना खरात तिथे सापडली नाही. यानंतर पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.