ऑटोचे चाक निखळल्याने अपघात

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
चालक जखमी, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना
 
वर्धा, 
Auto accident शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या शिवाजी चौक परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास धावत्या ऑटोचे पुढील चाक अचानक निखळल्याने वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकावर जाऊन आदळले. या अपघातात चालक जखमी झाला असून सुदैवाने ऑटोमध्ये एकही प्रवासी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
 
 
Auto accident
 
Auto accident  मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ३१ एफ. बी. ०६४६ क्रमांकाचा ऑटो आर्वी नाका चौकातून शिवाजी चौकाच्या दिशेने येत होता. सकाळची वेळ असल्यामुळे परिसरात वाहतुकीची वर्दळ होती. दरम्यान, अचानक ऑटोचे पुढील चाक निखळले. चाक निखळताच ऑटो अनियंत्रित झाला आणि दुभाजकावर आदळून पुढे रेलिंगमध्ये अडकला. अपघाताचा आवाज मोठा झाल्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही जणांनी धाडस दाखवत रेलिंगमध्ये अडकलेल्या ऑटोमधून चालकाला बाहेर काढले. जखमी चालकाच्या डोळ्याजवळ मार लागल्याचे दिसून आले. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. रेलिंगमध्ये अडकलेला ऑटो बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.