मुंबई
Bhoot Bangla movie प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा भूत बंगला हा चित्रपट आता नियोजित तारखेपेक्षा एक आठवडा उशिरा प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून सशुल्क विशेष पूर्वप्रदर्शन सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
निर्माती एकता कपूर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, वितरण भागीदार आणि प्रमुख बाजारपेठेतील चित्रपटगृह चालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रेक्षकांना अधिक दर्जेदार आणि समाधानकारक चित्रपटगृह अनुभव मिळावा, यासाठी प्रदर्शन पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे चित्रपटाला अधिक व्यापक प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकता कपूर पुढे म्हणाल्या की, Bhoot Bangla movie प्रदर्शनाची तारीख पुढे नेल्यामुळे चित्रपटाला योग्य प्रमाणात स्क्रीन, प्रभावी प्रचार आणि प्रेक्षकांचे अधिक लक्ष मिळेल. हा निर्णय निर्माते, वितरक आणि चित्रपटगृह मालक यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा दर्जा उंचावण्यास मदत करेल.