प्रकृती चिंताजनक
सिंदी (रेल्वे),
घBike accident रासमोर खेळत असलेल्या ८ वर्षीय बालकाला एका भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात बालक गंभीर जखमी झाला असून, सध्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. तुषार निलेश पाटील (८) असे गंभीर जखमीचे नाव आहे. ही घटना गुरुवार २ रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.
Bike accident मिळालेल्या माहितीनुसार, तुषार हा घरासमोर खेळण्यात दंग होता. याच वेळी एका भरधाव दुचाकीस्वाराने वाहनावरील नियंत्रण गमावले आणि खेळत असलेल्या तुषारला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तुषार लांबवर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोयाला आणि शरीराच्या अन्य भागांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रताच्या थारोळ्यात पडलेल्या तुषारला कुटुंबीयांनी तातडीने कस्तुरबा रुग्णालयात हलवले. त्याची प्रकृती नाजूक असल्याने डॉटरांनी त्याला तात्काळ बालरोग अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. अपघात घडताच दुचाकीचालक फरार झाला. या बेशिस्त वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.