धरणाशेजारील बोरीत पाण्यासाठी महिलांची परवड

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
कोट्यवधींची योजना ठप्प
 
सेलू, 
Bor Dam: Water shortage तालुयातील बोर धरणाच्या अगदी जवळ वसलेल्या बोरी (कोकाटे) गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, महिलांना दररोज पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. धरणाशेजारी गाव असतानाही पाण्यासाठी अशी परवड होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यत होत आहे.
 
 
Bor Dam
 
Bor Dam: Water shortage  गावासाठी काही वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात या योजनेचा कोणताही फायदा ग्रामस्थांना झालेला नाही. उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत आजपर्यंत पाणी साठवले गेले नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. परिणामी, महिलांना पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावून तासन्तास पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. याचा विशेषतः घरकाम, शेती आणि मुलांच्या संगोपनावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. गावात पाणीटंचाई कायम असतानाही प्रशासनाकडून केवळ दुरुस्तीच्या नावाखाली खर्च होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. काही भागात दोनपैकी एकच नळ सुरू असल्याने संपूर्ण वस्ती त्यावर अवलंबून आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच बंद पडलेली योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
 
 

ग्रामपंचायत प्रशासननाने नळ योजना पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. त्यामुळे गावात नळाला आठवड्यात एखादी दिवस पाणी येते. कधी कधी तर तेवढेही पाणी मिळत नाही. गावाततील महिलांना पाण्यासाठी विहिर व हॅण्डपंपची वाट धरावी लागते, अशी प्रतिक्रीया गजू मुरके यांनी दिली.