बैलजोडी चोरीचा गुन्हा उघड

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
 
वर्धा, 
आंजी (मोठी) शेतशिवारातून Bullock pair theft case बैलजोडी चोरून नेणार्‍या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातून बैलजोडी, मालवाहू वाहन, मोबाईल असा ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई येळाकेळी-वर्धा मार्गावरील इको पार्कजवळ करण्यात आली. तुळशीराम गांजुडे (४४) रा. आंजी (मोठी) यांनी शेतात बैलजोडी बांधून ठेवली होती. शेतात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बैलजोडी चोरून नेली. तक्रारीवरून खरांगणा पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते.
 
 
bal
 
Bullock pair theft case  दरम्यान, गोपनीय माहिती मिळाली की, रोशन वंजारी रा. वर्धा याने त्याच्या बोलेरो पिकअप एम. एच ४० वाय. २०४८ क्रमांकाच्या मालवाहू वाहनात बैलजोडी येळाकेळी मार्गे वर्धेकडे नेल्याचे कळले. त्याआधारे पोलिसांनी येळाकेळी ते वर्धा मार्गावरील इको पार्कजवळ नाकाबंदी केली. त्याच क्रमांकाचा मालवाहू थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये रोशन वंजारी (३६) रा. आंजी मोठी आणि पांढर्‍या रंगाची बैलजोडी होती. बैलजोडीबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून बैलजोडी, मालवाहू वाहन, मोबाईल, असा ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंह ठाकूर, मनोज धात्रक, पोलिस कर्मचारी हमीद शेख, महादेव सानप, गोविंद मुंढे, विनोद कापसे, स्मिता महाजन यांनी केली.