- देवरी पोलिसांची कारवाई : २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया,
Burglary thief arrested घरफोडी करणार्या चोरट्याचा देवरी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केले. यावेळी त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल, चांदीचे दागिणे व रोख असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ३१ मार्च रोजी करण्यात आली. शिवम मधुकर मडावी (२०) रा. नवेगावबांध, ता. अर्जुनी मोरगाव,ह.मु. परसटोला, ता. देवरी असे त्या चोरट्याचे नाव आहे.
Burglary thief arrested पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दाीत येत असलेल्या देवरी शहरात २५ मार्च रोजी अज्ञात चोरट्याने रात्रीचे वेळी घरफोडी करुन मोबाईल, सोने-चांदीचे दागीने व नगदी रुपये चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी देवरी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करून तपासाला सुरवात केली. गोपनिय माहिती व आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोपीचा शोेध घेण्यात आला असता सदर घरफोडी आरोपी शिवम मधुकर मडावी असल्याचे निष्पन्न झाले. या अधारे त्याला ३१ मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता सदर चोरी केल्याचे कबूल केले. दरम्यान, आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुददेमाल २ मोबाईल, चांदीचे दागीने व नगदी रुपये असा २० हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मानिकपुरी करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक गेडाम, पोलिस उपनिरिक्षक गेडाम, पोलिस हवालदार हातझाडे, पोलिस नायक कांदे, पंधरे, पोलिस शिपाई मेंढे, पांडे यांनी केली.