मुंबई-गोवा महामार्गावर भीषण बस अपघात; २ ठार, ३५ जखमी

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
रायगड,
bus-accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास एक खासगी स्लीपर बस भीषण अपघाताचा बळी ठरली. सुकेळी घाटात वळण घेताना बसचा चालक वाहनावर नियंत्रण गमावल्याने बस पलटी झाली. यात दोन प्रवाशांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३५ ते ३८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची अवस्था चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
 

accident
 
 
 
अपघाताचा भीषण आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस व बचाव पथकेही तात्काळ तिथे दाखल झाली. जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
 
स्थानिक आणि प्रवाशांनी सुरुवातीला असा आरोप केला होता की, बसचा अतिवेग आणि दरीत घेतलेल्या धोकादायक वळणामुळे हा अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.