नागपूर ,
Children's Theater Council बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यरत असलेल्या बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दि. 29 मार्च 2026 रोजी झालेल्या निवडीत . श्याम आस्करकर यांची अध्यक्षपदी, रूपाली मोरे यांची कार्याध्यक्षपदी, तर अभिषेक बेल्लारवार यांची प्रमुख कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. डॉ. रवींद्र भुसारी यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली.
दि. 31 मार्च रोजी विशेष सभेत 21 सदस्यांनी पदभार स्वीकारला. मागील आठ वर्षांत परिषदेतर्फे विविध स्पर्धा व कार्यशाळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. Children's Theater Council यावेळी रवींद्र फडणवीस यांनी उपक्रमांचा विस्तार करण्याचे आवाहन केले, तर बाळ कुलकर्णी यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
सौजन्य;डॉ. रवींद्र भुसारी,संपर्क मित्र