नागपूर ,
Choukoni Maidan, Hanuman Nagar चौकोनी मैदान, हनुमान नगर येथील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे ६ वाजता हनुमान जन्म सोहळा व अभिषेक विधी पार पडला. यानंतर दुपारी ३ वाजता महिलामंडळाच्या वतीने सुंदरकांड पठण व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सायंकाळी ६ वाजतारमेश शेटे व त्यांच्या टीमने ढोलकीच्या तालावर सामूहिक मारुती स्तोत्र, रामरक्षा तसेच ५ वेळा हनुमान चालीसा पठण करून वातावरण भक्तिमय केले.यानंतर महाआरती संपन्न झाली व लगेचच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रभाग ३१ चे नगरसेवक गणेश चार्लेवार, . मंगला म्हस्के, . मानसी, नितीन भाऊ सिमले, भाजपा पदवीधर आघाडीचे देवेन दस्तुरे,Choukoni Maidan, Hanuman Nagar शक्ती ठाकूर, महिला आघाडीच्या . जयश्री गभणे, रा.स्व.संघाचे गिरीश हरकरे, डॉ. प्रदीप पहाडे, विजय शेंडे तसेच दक्षिण नागपूर काँग्रेसचे गिरीश भाऊ पांडव व सैनी ट्रॅव्हल्सचे बलजीत सैनी यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री पवनसूत हनुमान मंदिर जन्मोत्सव समितीने विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:संदीप तिजारे,संपर्क मित्र