काँक्रीट मिसर ट्रक पलटी

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
हिंगणघाटनजीकच्या दाभ्याजवळ भीषण अपघात
 
 
हिंगणघाट, 
Concrete truck apghat नजीकच्या दाभा येथून वाघोलीकडे जाणार्‍या टी-पॉईंटवर एम. एच. ३२ ए. जे. ४७३७ क्रमांकाचा काँक्रीट मिसर ट्रक पलटी झाला. ही घटना आज शुक्रवार ३ रोजी घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी चालक आणि लिनर दोघेही ट्रकमध्ये होते. चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला तर लिनरने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करण्यात यश मिळवले.
 
 
accdkdsl
 
Concrete truck apghat  घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या ११२ पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. पथक प्रमुख प्रवीण बोधाणे यांनी सहकार्‍यांसह आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रकखाली अडकलेल्या चालक सावरिया लाल याला मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात भीषण असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक तसेच लिनर दोघेही किरकोळ जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.