सेलू,
Death by falling into the Bor river शौचासाठी गेलेल्या इसमास अचानक फिट आल्याने तो बोर नदीत पडून मृत्यू झाल्याची घटना तालुयातील हिंगणी येथे शुक्रवार ३ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दिनेश सिंग गायकी (३५) रा. हिंगणी असे मृतकाचे नाव आहे.
Death by falling into the Bor river मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश गायकी हे नेहमीप्रमाणे सकाळी बोर नदीकाठी शौचासाठी गेले होते. यावेळी त्यांना अचानक फिट आली. त्यामुळे तोल जाऊन ते तोंडावर पाण्यात पडले. पाण्यात पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच सेलू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.