यवतमाळ,
Dhangar District Fair धनगर अधिकारी, कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा, यवतमाळच्या वतीने जिल्हा मेळावा व महिलादिनाचा कार्यक‘म सहकार भवनात पार पडला. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष ढोले, उद्घाटक उद्योजक तथा धनगर समाजाचे नेते पांडुरंग खांदवे, स्वागताध्यक्ष माजी जि.प. सदस्य रेणू शिंदे पाटील, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. अमृता पुनसे, संघटनेचे मार्गदर्शक वसंत ढोके, प्रमुख अतिथी लता खांदवे, संजय पाटील, बाळासाहेब शिंदे, प्रा. डॉ. राजीव मुंदाने, प्रकाश जानकर, रमेश महानूर, संघटनेचे राज्य सचिव शरद उरकुडे यांची उपस्थिती होती.
संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष अनिल ढोले म्हणाले, संघटन ही काळाजी गरज आहे. संघटित होऊन दबाव गट निर्माण होतो. यातून संघटना निर्माण झाल्यास अन्यायाविरोधात आवाज उठविणे शक्य होते. राजकीय इच्छा शक्तीअभावी धनगर आरक्षणाचा मुद्दा अद्यापही कायम आहे. समाजातील कामे करण्यासाठी संघटीत होण्याशिवाय पर्याय नाही. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेने राज्यभर विणलेले जाळे घट्ट करण्यासाठी समाजबांधवांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले. पांडुरंग खांदवे यांनी सांगितले की, समाजासह कर्मचारी, अधिकार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या पाठिशी सर्वांनी उभे राहावे. संघटनेत अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य मुंदाने यांनी, संघटनेमुळेच अधिकारी, कर्मचार्यांचे ऐक्य दिसून येत असल्याचे अधोरेखित केले. वसंत ढोके म्हणाले, समाजाला असलेल्या आरक्षणानुसार पदभरती होणे गरजेची आहे. याबाबत संघटनेच्या वतीने अति दक्ष राहून पदभरतीबाबत अधिक जागृत राहण्याचे आवाहन केले. रेणू शिंदे यांनी, महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठीचे व्यासपीठ याच कार्यक‘मातून मिळत असल्याचे सांगितले. डॉ. अमृता पुनसे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अधिकारी, कर्मचार्यांनी ताणतणाव कसा दूर करावा याबाबत मार्गदर्शन केले.
Dhangar District Fair कार्यक‘मासाठी कोरडे, चंदू गावंडे, नीळकंठ येरेकर, राजेश मदने, सुरेश भावेकर, अशोक माहुरे, सुनील सोडगिर, सचिन पानोडे, अभिजित खरात, राहुल मासाळ, गजानन मासाळ, विनोद शिंदे, संतोष शेंडगे, विशाल झाडे, रोहण मस्के, अंकुश गलाट, वैभव मस्के, राजू जामकर, विलास शेरकी, सूर्यभान चिडे, रवींद्र कचरे, भारती इसळ, प्राजक्ता वाघमोडे, जयश्री मदने, संजीवनी खुजे, मारकड, जयमाला शिंदे, अॅड. कृष्णा शिंदे, उषा मुंदाने, शरयू कोंडगिरे, माधुरी शिंदे, स्मिता टोंचर, अनुश्री कसरेवार, ललिता केमेकार, नंदिता गावंडे, मीनाक्षी कोरडे, येरेकर यांच्यासह जिल्हाभरातील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक लक्ष्मीप्रसाद वाघमोडे यांनी केले. संदीप खांदवे यांनी अहवाल वाचन केले. संचालन वर्षा भूतनेर यांनी, तर आभार भुमन्ना कसरेवार मानले.
विविध कार्यक्रम उत्साहात
रक्तदान चाचणी शिबिरात समाजबांधवांनी सहभाग घेतला. यात महिलांसह पुरुषांची शुगर, हिमोग्लोबिनची तपासणी डायाभाई मजेठिया आयुर्वेदिक महाविद्यालयातील डॉक्टरांच्या चमूंनी केली. सांस्कृतिक कार्यक‘म वनीता झुरळे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. तसेच ‘साडी माझ्या अहिल्या मातेची’ हा उपक‘म अनिल टोंचर यांच्या मार्गदर्शनात पार पडला.