डिजिटल पेमेंटचा विक्रम, मार्चमध्ये यूपीआय व्यवहार कोटींच्या वरती

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
मुंबई,
upi-transactions-in-march : भारतात सुरु झालेली यूपीआय (युपीआय) ही डिजिटल पेमेंट प्रणाली आज देशभर आणि जगभर लोकप्रिय झाली आहे. हातात रोख नसली तरी नागरिक आता भीती न बाळगता बिनधास्तपणे डिजिटल व्यवहार करतात. किराणा मालापासून ते लाखो रुपयेपर्यंतचे व्यवहार युपीआयच्या माध्यमातून सहज केले जात आहेत. विशेषतः सणासुदीच्या काळात युपीआय व्यवहारात अधिक भर पडते.
 

upi 
 
 
प्राप्त आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात युपीआयचा वापर करणाऱ्यांची संख्या कोटींपर्यंत पोहोचली आहे. एकट्या मार्चमध्ये २२.६४ अब्ज व्यवहार नोंदवले गेले आहेत. मागील वर्षाच्या मार्च महिन्याशी तुलना करता, या वर्षी व्यवहारात १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारीत २६.८४ लाख रुपये इतके व्यवहार झाले होते, तर मार्च महिन्यात त्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
मार्च महिन्यात होळी, धुळिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, ईद अशा अनेक सणांसह देवतांच्या यात्रा, जत्रा आणि उत्सव आयोजित होतात. या सणांच्या निमित्ताने देशभर मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते, ज्यासाठी यूपीआयचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. दररोज सरासरी ७३ कोटी व्यवहार होत असून, यांचे दैनिक मूल्य ९५,२४३ कोटी रुपये इतके आहे.
 
आजच्या काळात भारतात डिजिटल पेमेंट्सवर भर दिला जात असून, एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ८५ टक्के व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून केले जातात. या प्रणालीमुळे नागरिकांना व्यवहार जलद, सुरक्षित आणि सोपे झाले आहेत.