71 लाखांना गंडा : सत्य समोर येताच सगळेच हादरले!

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
डोंबिवली
Dombivli CBI fraud case डोंबिवलीतील एका नोकरदाराला बनावट ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनी चौकशीची भीती दाखवत तब्बल 71 लाख 10 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, चौकशीची भीती दाखवणारे सीबीआय अधिकारी नव्हते त्यांच्या नावाने नोकरदाराला गंडा घातल्याचे समोर आल्याने सगळेच हादरले आहेत.
 

Dombivli CBI fraud case  
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात कंपनीत काम करणाऱ्या रहिवासी महेश मनोहर आगरकर यांच्या मोबाईलवर मार्चच्या पहिल्या आठवड्यातच एका अज्ञात व्यक्तीने फोन करून स्वतःला टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी (टीआरए) आणि सीबीआय अधिकारी असल्याचा दावा केला. त्यांच्या नावावर घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत सुरु असल्याची भ्रामक माहिती देण्यात आली होती.
 
 
यानंतर ‘सीबीआय’ अधिकारी म्हणून ओळख करून दिलेल्या संदीप कुमार राव आणि करण शर्मा यांनी आगरकर यांच्या बँक खात्यांमध्ये विविध देणे‑घेणे असल्याचे भासवून मोठी रक्कम भरावी, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या कथित आदेशांच्या नावाखाली त्यांनी ७१ लाख १० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यास भाग पाडले होते, अशी तक्रार पोलिसांना मिळाली.
पैसे जमा केल्यानंतर संशय Dombivli CBI fraud case  वाढल्यावर आगरकर यांनी हे संपूर्ण प्रकरण पत्नीशी शेअर केले. पत्नीने आरोपींचे सांगितलेले ठरवलेले दस्तऐवज तपासल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि या बनावट ‘सीबीआय’ अधिकारीांच्या विरोधात फसवणूक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या प्रकरणात संशयितांवर पुढील कारवाई सुरू असून, पोलिस तपास अधिक गहन करत आहेत. नागरिकांनी कुणीही केंद्रीय एजन्सींचे नाव घेऊन पैसे मागत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये व तत्काळ पोलिसांकडे माहिती द्यावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. या प्रकारातून केंद्रिय यंत्रणांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अशीही सूचना पोलिसांनी दिली आहे.