गॅस टंचाईचा ग्राहकांना फटका सकाळी चार पासून लांबच लांब रांगा

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
इंडियन गॅस हिरोळे एज्नसी तर्फे ग्राहकांना मंडप, पाणी, चहाची सुविधा
 
 
बुलढाणा, 
Gas shortage सध्या सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झाल्याने दिवसेंदिवस टंचाई वाढत असल्याने याचा फटका ग्राहकांना बसत आहे. बुलढाणा शहरात इंडियन गॅस एज्नसीचे सर्वाधिक ३० हजारावर ग्राहक संख्या आहे. त्यांना महिन्यातून कंपनीतर्फे फक्त १० हजार सिलेंडर मिळत आहे. २० हजार सिलेंडरची तफावत निर्माण झाल्याने सकाळी ४ वाजेपासून ग्राहकांच्या लांबच लांब रांगा तहसिल चौकातील हिरोळे गॅस एज्नसी ऑफिस जवळ दिसत आहे.
 
 
Gas
 
Gas shortage  इंडियन गॅस एज्नसीचे मालक अर्चित अमोल हिरोळे यांनी ग्राहकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप, पाणी व चहाची सुविधा स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भात अर्चित हिरोळे यांच्याशी संपर्क साधला असता गॅस कंपनीतर्फे ग्राहक आणि उपलब्ध होणारे सिलेंडर यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.