मारेगाव तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या 9 जागांसाठीपोटनिवडणूक जाहीर : 28 एप्रिलला मतदान

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
मारेगाव, 
Gram Panchayat by-elections तालुक्यातील मार्डी, हटवांजरी, बुरांडाखडकी, नवरगाव या चार ग्रामपंचायतच्या रिक्त 9 जागांची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या नऊ जागांकरिता 28 एप्रिलला मतदान होणार आहे. मार्डी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेले सदस्य तथा उपसरपंच सुधाकर डाहुले यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे नामाप्र आरक्षण असलेल्या या जागेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. सोबतच नामनिर्देशनच दाखल न झाल्याने रिक्त असलेल्या हटवांजरी येथील प्रभाग 1 मधील दोन जागांमध्ये अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण तर प्रभाग 2 मध्ये अनुजमाती महिला आणि प्रभाग 3 मध्ये अनुजमाती अशा एकूण चार जागांकरिता पोटनिवडणूक होणार आहे.
 
 
elections
 
Gram Panchayat by-elections बुरांडा खडकी येथील थेट निवडणुकीत सरपंचपदावर निवडून आल्याने प्रभागात निवडून आलेल्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने एक पद रिक्त तर दोन जागी सदस्य म्हणून निवडून आल्याने एका सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने दुसरे पद रिक्त असल्याने प्रभाग 1 मध्ये अनुजमाती महिला, तर प्रभाग 3 मध्ये अनुजमाती या दोन जागांकरिता पोटनिवडणूक होत आहे. नवरगाव ग्रामपंचायतमध्ये कर आकारणीचा भरणा न केल्याने दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र करण्यात आले होते. त्याकरिता प्रभाग 1 सर्वसाधारण तर प्रभाग 3 नामाप्र या दोन जागांकरिता पोटनिवडणूक होत आहे.
पोटनिवडणूक कार्यक्रम
मार्डी, खडकी बुरांडा, हटवांजरी व नवरगाव या चार ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 31 मार्चला कार्यक्रम घोषित करण्यात आला. 7 ते 13 एप्रिल दरम्यान सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 मारेगाव तहसील कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशन पत्राचा नमुना पारंपारिक पद्धतीने भरावयाचा असल्याने त्याचा नमुना तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित वेळेत इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र भरून निवडणूक निर्णय अधिकाèयाकडे दाखल करणे आवश्यक आहे. दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार, 15 एप्रिलला होणार असून 17 एप्रिलला दुपारी 3 पर्यत नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्हे वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढणाèया उमेदवारांची यादी याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मंगळवार, 28 एप्रिलला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.