पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
अमरावती विभागीय शिक्षक मेळावा
अमरावती,
शिक्षणक्षेत्रातील संगीताताईंचा गेला १५ वर्षापासूनचा संघर्ष हा खूप मोठा आहे. मंत्रालयीन स्तरावरील धोरणात्मक प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमीच संगीताताई सोबत आहे. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवून घ्यावे, त्यांच्या मागणीला नेहमीच माझा पाठिंबा असल्याचे प्रतिपादन अमरावतीचे Guardian Minister Chandrashekhar Bawankule पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
Guardian Minister Chandrashekhar Bawankule भाजपा शिक्षक आघाडी व शिक्षण संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी विभागीय शिक्षक मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, संगीताताईंचे शिक्षणक्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी आजपर्यंत शिक्षण क्षेत्राशिवाय कुठलाही वैयक्तिक प्रश्न मांडला नाही. राष्ट्रपती पुरस्कार विजेते वारे गुरुजी म्हणाले, विविध अध्ययन पद्धती व तंत्रज्ञानाचा मनापासून वापर केल्यास विद्यार्थ्यांना घडविणे सहज शक्य आहे. व्यासपीठावर भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा. डॉ. अनिल बोंडे, किरणताई महल्ले, प्रवीण पोटे, महापौर श्रीचंद तेजवानी, आ. केवलराम काळे, आ. प्रवीण तायडे, आ. राजेश वानखडे, आ. चंदू उर्फ उमेश यावलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, किरण पातुरकर, प्रा. दिनेश सूर्यवंशी, जयंतराव डेहनकर, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, रवींद्र खांडेकर, हेमंत काळमेघ, नितीन गुडधे, अनंत गुढे , डॉ. माधुरी चेंडके, पंडित पंडागळे, डॉ. वसुधा बोंडे, वसंतकुमार मालपाणी, बाळासाहेब वानखडे, रामकृष्ण कळसकर, प्रवीण गुल्हाने, रणजीत पावडे, प्रताप अभ्यंकर, डॉ. सिकंदर मनवरे, डॉ. हेमंत देव, विक्रम ठाकरे, राहुल मोहोड, बाळासाहेब लहाने, डॉ. नितीन वानखडे, श्रीपाद तारे, अरुण ठाकरे, अमोल महात्मे यासह अमरावती विभागातील शिक्षक बांधव व भगिनी उपस्थित होत्या.