पात्र मुली एचपीव्ही लसीकरणासाठी सरसावल्या

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे कर्करोग विरोधी लस
 
मानोरा, 
HPV vaccination किशोरवयीन मुलींचे भविष्यात कर्करोगापासून बचाव व्हावे यासाठी शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जात असलेली एचपीव्ही लसीकरणासाठी आता पात्र मुली सरसावल्या असून ग्रामीण रुग्णालयात अशा मुलींचे लसीकरण केल्या जात आहे. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजसिंह पवार यांच्या मार्गदर्शनात सदरील लस आरोग्य प्रशासना कडून ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना दिल्या जात आहे.
 
 
HPV vaccination
 
HPV vaccination भारतातील महिलांच्या मृत्यू प्रमुख कारण बनणार्‍या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला मुली ज्यावेळी नऊ ते चौदा वर्षे वयोगटाच्या असतात त्याचवेळी ही लस दिली गेल्यास जीवघेणा कर्करोगाच्या आजारापासून बचाव होण्याचे प्रमाण ९० टक्के पेक्षा अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनाअंती स्पष्ट झाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. विवाहनंतर मुलींच्या प्रजनन क्षमतेवर उपरोक्त लसीमुळे कुठलेही विपरीत परिणाम होत नसून हा एक निव्वळ गैरसमज असल्याचे सुद्धा या लसी संदर्भात प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले असल्याने ९ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलींना ही सुरक्षित लस देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.