स्पर्धांमुळे भारताची सुरक्षा व्यवस्था आणखी सशक्त

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
- केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राॅय
- अ.भा. पाेलिस कर्तव्य मेळावा
- तेलंगना पाेलिसांना सांघिक विजेतेपद

अनिल कांबळे
नागपूर, 
India's security system पाेलिस दलांमध्ये अखिल भारतीय पाेलिस ड्युटी मीटमध्ये माहिती व तंत्रज्ञान यासह काैशल्यावर आधारित स्पर्धा हाेत असल्यामुळे भारताची सुरक्षा व्यवस्था आणखी सशक्त झाली आहे. स्पर्धांमधून बाैद्धिक काैशल्य पणाला लागून सक्षम दलाचे निर्माण हाेते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राॅय यांनी केले. ते 69 व्या अखिल भारतीय पाेलिस ड्युटी मीटच्या समाराेप साेहळ्यात बाेलत हाेते. सर्वाेत्कृष्ट संघाचे पारिताेषिक तेलंगाना राज्य पाेलिस दलास प्रदान करण्यात आले.
 
 
 
po 1
अ.भा. पाेलिस कर्तव्य मेळाव्याचे आयाेजन नागपूर पाेलिस आणि गुन्हे अन्वेषण विभागार्ते करण्यात आले हाेते. आज या कर्तव्य मेळाव्याचा समाराेप समारंभ माेठ्या थाटात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हाेते. समाराेप कार्यक्रमात गृह राज्यमंत्री नित्यानंद राॅय म्हणाले की, पाेलिस कर्तव्य मेळावा हा पाेलिसांचे व्यावसायिक काैशल्य वाढविणे, वेगवेगळ्या राज्यांच्या तपास पध्दती अवगत करून नविन तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यात आले. तंत्रज्ञानविषयक गुन्हेगारी वाढली असल्याने गुन्हे तपासात आर्टीिफशीयल इंटेलीजेन्सचा तसेच नविन तपास पध्दती व तंत्रज्ञान अवगत करून, त्याचा तपास पध्दतीमध्ये अधिकाधिक वापर करुन गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवावे व क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करावी असे ते म्हणाले. कार्यक्रमाला पाेलिस महासंचालक सदानंद दाते, पाेलिस आयुक्त डाॅ. रविंद्रकुमार सिंगल, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सुनील रामानंद यांची उपस्थिती हाेती. सरतेशेवटी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आदिवासी नृत्य, पाईप डान्स व रायफल पीटीचे सादरीकरण हाेऊन कार्यक्रमाचा समाराेप झाला.
 

po 2 
 
स्पर्धेतील विजेते संघ
India's security system  काॅम्प्युटर अवेरनेस स्पर्धेमध्ये प्रथम पारिताेषिक तेलंगाना राज्य संघास तर द्वितीय पुरस्कार सिमा सुरक्षा दलास (बीएसएफ) प्रदान करण्यात आले. डाॅग काॅम्पीटीशनमध्ये प्रथम पुरस्कार सीआरपीएफचे श्वान पथकास तर द्वितीय पुरस्कार सिमा सुरक्षा बलास (एसएसबी) तसेच बेस्ट डाॅग ऑफ दी काॅम्पीटिशन पुरस्कार सीआरपीएफचा बाॅबी श्वानास मिळाला. व्हिडीओग्राीमध्ये प्रथम पुरस्कार तेलंगाना तर द्वितीय पुरस्कार महाराष्ट्र पाेलिस दलाला दिला. अ‍ॅन्टी सबाेटेज चेक या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार तेलंगाना राज्य तर द्वितीय पुरस्कार महाराष्ट्र पाेलिस दलास मिळाला. साईन्टीीक एड टू इन्व्हीस्टीगेशन या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार तामिळनाडू राज्य तर द्वितीय पुरस्कार तेलंगाना राज्य यांना दिला. ाेटाेग्राी या स्पर्धेत प्रथम पुरस्कार बाॅर्डर सिक्युरिटी ाेर्स तर द्वितीय पुरस्कार तेलंगाना राज्याला देण्यात आला. बेस्ट आयटी प्राेजेक्ट इन सेंट्रल आर्मड ब पाेलीस ाेर्सेस सेंट्रल पाेलिस ऑर्गनायझेशन या सदराखाली महाराष्ट्र राज्य पाेलिस दलातील अकाेला जिल्ह्याला देण्यात आला.