विशाखापट्टणम
Indian Navy भारताची सागरी सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने शुक्रवारी एक नवीन अध्याय जोडला गेला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत स्वदेशी बनावटीच्या स्टेल्थ फ्रिगेट तारागिरी आणि आयएनएस अरिदामनला नौदलात सामील करून घेतले. याप्रसंगी राजनाथ सिंह म्हणाले, आयएनएस तारागिरीच्या समावेशामुळे भारताच्या नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. आयएनएस तारागिरी ब्रह्मोस आणि सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. इतिहास आपल्याला सांगतो की, नौदल शक्ती मजबूत केल्याशिवाय कोणताही देश शक्तिशाली मानला जाऊ शकत नाही.
संरक्षण मंत्री पुढे म्हणाले,Indian Navy हे शहर स्वतःच भारताच्या सागरी सामर्थ्याचे साक्षीदार राहिले आहे. त्यामुळे विशाखापट्टणममध्ये आयएनएस तारागिरीचे जलावतरण हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. आपल्या सांस्कृतिक वारशापासून ते आजच्या सामरिक वास्तवापर्यंत भारताने नेहमीच समुद्रावर आपली दिशा निश्चित केली आहे. भारताचे समुद्राशी नेहमीच एक अद्वितीय नाते राहिले आहे आणि काळानुसार समुद्राशी असलेले आमचे हे नाते अधिकच दृढ झाले आहे. आपण केवळ आपल्या किनारपट्टीच्या संरक्षणापुरते मर्यादित राहू नये, तर राष्ट्रीय हिताशी संबंधित महत्त्वाचे सागरी मार्ग, अरुंद सागरी मार्ग आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा देखील सुनिश्चित केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, तेव्हा भारतीय नौदलाने आपल्या व्यापारी जहाजांची आणि तेलवाहू जहाजांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. आपले नौदल केवळ भारताच्या हितांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, इतकेच नव्हे तर, गरज पडल्यास, आपल्या नागरिकांचे आणि व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर सर्व शक्य पावले उचलण्यासही सक्षम आहे, हे सिद्ध केले आहे. ही क्षमता भारताला एक जबाबदार सागरी शक्ती बनवते.
95 टक्के व्यापार सागरी मार्गांनी होतो
संरक्षण मंत्री पुढे म्हणाले, 11,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा किनारा लाभलेला आणि तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आपला देश समुद्राशिवाय आपल्या विकासाची कल्पनाही करू शकत नाही. आपला जवळपास 95 टक्के व्यापार सागरी मार्गांनी होतो. आपली ऊर्जा सुरक्षा देखील समुद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे, हे स्पष्ट आहे की एक मजबूत आणि सक्षम नौदल हा आपल्यासाठी केवळ एक पर्याय नाही, तर एक गरज आहे, असेहही ते म्हणाले.
तारागिरीला समुद्राचे वादळ का म्हटले जातेे?
आयएनएस तारागिरी हा प्रोजेक्ट 17ए अंतर्गत बांधलेली एक स्वदेशी युद्धनौका आहे. या प्रकल्पातील ही चौथी फ्रिगेट आणि माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने बांधलेले तिसरे जहाज आहे. ही युद्धनौका 28 नोव्हेंबरला अधिकृतपणे नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. यात 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे, जे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
आयएनएस तारागिरी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. ती ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र, एमएफ-स्टार रडार आणि एमआरएसएएम हवाई संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे. यात 30 मिमी आणि 12.7 मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीमचाही समावेश आहे