नागपूर,
Jaiprakash Nagar, Nagpur जयप्रकाश नगर येथील जुन्या रेल्वे क्रॉसिंगजवळ, प्लॉट क्रमांक 20 समोरील किरण अपार्टमेंट्स परिसरात एक मोठे वाळलेले गुलमोहराचे झाड वादळी पावसामुळे पडून धोकादायक स्थितीत लटकत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
आज या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत दुर्घटना होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.Jaiprakash Nagar, Nagpur याबाबत सुमारे वर्षभरापूर्वीच महापालिका उद्यान विभाग तसेच लक्ष्मीनगर झोनल कार्यालयाकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी तातडीने झाड हटविण्याची मागणी केली आहे.
सौजन्य :मिलिंद तोत्रे,संपर्क मित्र