किडनी घोटाळ्याचे नेटवर्क उन्नाव-जालौनपर्यंत

चौकशीत नवे खुलासे, स्थानिक डॉक्टरांचाही सहभाग

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
कानपूर,
Kanpur kidney scam कानपूरमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील आरोपींचे नेटवर्क आसपासच्या जिल्ह्यांपर्यंत पसरले आहे. पोलिसांना उन्नाव आणि जालौनमध्ये काही धागेदोरे सापडले आहेत. गुरुवारी पोलिस पथके रवाना करण्यात आली. किडनी प्रत्यारोपण घोटाळ्यात उन्नावमधील एक डॉक्टर आणि जालौनमधील एका नर्सिंग होम ऑपरेटरची नावे समोर आली आहेत.
 

Kanpur kidney scam, kidney transplant fraud, Unnao kidney racket, Jalaun kidney network, 
कानपूरमधील सुमारे 10 नर्सिंग होमच्या नावांनंतर आता उन्नाव आणि ओराईमधील काही नर्सिंग होमदेखील संशयाच्या घेèयात आले आहेत. त्या नर्सिंग होममधील रुग्णांना शहरात आणले गेले होते की, किडनी प्रत्यारोपणानंतर तेथील खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले होते, हे निश्चित करण्यासाठी तपास सुरू झाला आहे. आरोपी डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाèयांशी संबंधित असलेल्या उन्नावमधील एका डॉक्टरचे नाव समोर आले आहे. त्याला शोधण्यासाठी छापे टाकले जात आहेत. रावतपूर पोलीस एनसीआरमधील डॉ. रोहित, डॉ. अफझल, डॉ. अनुराग आणि डॉ. वैभव यांचा शोध घेत आहेत. या डॉक्टरांपैकी एक उन्नावचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.तो बऱ्याच  काळापासून उन्नावमधील खासगी रुग्णालयांतील शल्यचिकित्सकांच्या संपर्कात होता. पोलिसांना त्यांच्या संबंधांचे पुरावे सापडले आहेत.
 
 
ओराईमधील एका नर्सिंग होम ऑपरेटरचाही सहभाग
या घोटाळ्यात ओराईमधील एका नर्सिंग होम ऑपरेटरचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही जिल्ह्यांतून अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंतच्या तपासात केशवपुरम येथील आहुजा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक शिवम अग्रवालबद्दलही माहिती समोर आली आहे. तो मूळचा जालौनचा आहे. त्याच्या कुटुंबियांबद्दल आणि नातेवाईकांबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.
 
 
नामांकित नर्सिंग होममध्ये किडनी प्रत्यारोपण
किडनी प्रत्यारोपण प्रकरणात शहरातील एका नामांकित आणि सुप्रसिद्ध नर्सिंग होमचे नाव समोर आले आहे. तिथे काही दिवसांपूर्वीच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या ओटी टेक्निशियन कुलदीप सिंग राघव आणि राजेश कुमारच्या चौकशीदरम्यान पोलिसांना ही माहिती मिळाली. दोघांनी अधिकाèयांना सांगितले की, नर्सिंग होम रेल्वे क्रॉसिंगजवळ आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण या होमला भेट देतात आणि येथे अनेक लहान-मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. पोलिसांनी नर्सिंग होमच्या दोन कर्मचाèयांना ताब्यात घेतले आहे.