शेतकरी रोशन कुळे यांनी मागितले इच्छा मरण

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन
किडनी विक्री प्रकरण

नागभीड, 
Kidney sale case तालुक्यातील मिंथूरचे पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारांच्या जाचामुळे कंबोडिया येथे जाऊन आपली किडनी विकल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आणि ते गाजले. त्यानंतर कुळे यांचे पूनर्वसन करण्याचे प्रयत्न शासनाकडून झाले. मात्र, आता त्यांनी सरकारकडे चक्क इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
 
 
Kidney sale case
 
Kidney sale case  याबाबतचे निवेदन रोशन कुळे यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते, मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, ही बाब गंभीर आहे. या प्रकरणी विलंब होत असल्यामुळे संबंधित आरोपींना त्यांची संपत्ती लपविणे, विक्री करणे किंवा पुरावे नष्ट करण्याची संधी मिळत आहे. तसेच माझी शेती मला अद्याप परत मिळालेली नाही. मी ‘मायक्रोफायनान्स बँके’कडून कर्ज उचलून सावकारांना पैसे दिले होते. आता त्यांचा तगादा सुरू झाला आहे. त्यामुळे मला माझी पूर्ण शेती परत करावी. मला व माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत व्हावी, सावकरांची संपत्ती लवकरात लवकर गोठवावी, आजपर्यंत माझ्या प्रकरणात ठोस कार्यवाही का झाली नाही, याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा मला व माझ्या कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे रोशन कुडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.