महागावमध्ये इंधन टंचाईचा फायदा घेत ‘काळाबाजार’

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
रात्री चढ्या दराने पेट्रोल-डिझेलची विक्री

महागाव,
Mahagaon: 'Black market' of fuel shortage महागाव तालुक्यातील 10 पेट्रोलपंप इंधन नसल्याच्या कारणावरून बंद असताना, दुसरीकडे याच टंचाईचा फायदा घेत इंधनाचा काळाबाजार जोरात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसा सर्वसामान्यांना ‘नो स्टॉक’चा फलक दाखवून रिकाम्या हाती परतवले जाते, मात्र रात्रीच्या अंधारात याच पंपांवरून चढ्या दराने पेट्रोल व डिझेलची सर्रास विक्री केली जात आहे. तालुक्यातील वाहनधारक इंधनासाठी वणवण भटकत असताना, काही पंपचालक व एजंट संगनमताने हा काळाबाजार करत आहेत. दिवसा नियमांचे बोट दाखवून सामान्य नागरिकांना पेट्रोल नाकारले जाते. मात्र, रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने ड्रम व कॅन भरून इंधन दिले जात आहे.
 
 
petrol
 
Mahagaon: 'Black market' of fuel shortage  विशेष म्हणजे, यासाठी प्रति लिटर 4 ते 5 रुपये जास्तीचे उकळले जात असून, शेकडो लिटर इंधनाची अशी अवैध विक्री रात्रीतून केली जात असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. सध्या शेतीकामासाठी डिझेलची मोठी गरज आहे. हतबल शेतकरी नाईलाजास्तव जास्तीचे पैसे देऊन इंधन खरेदी करत आहे. दिवसा कर्मचाèयांमार्फत कडक शिस्तीचा आव आणणारे पंपचालक रात्री मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून नफेखोरी करत आहेत. प्रशासनाचा कोणताही धाक उरला नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. महागाव तहसील प्रशासन व पुरवठा विभागाने केवळ कागदोपत्री साठा तपासण्यापेक्षा, रात्रीच्या वेळी या पंपांवर अचानक धाडी टाकण्याची गरज आहे. सामान्य जनतेला लुबाडणाèया अशा साठेबाज व काळाबाजार करणाèयांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.