सोलापूर,
Manoj Jarange Patil माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जारी वादाचे वातावरण तापलेले आहे. या प्रकरणी मराठा आरक्षण आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही मराठा आणि धनगर समाजाला हात जोडून शांततेने वाद सुटावा, अशी विनंती केली आहे. त्यांनी पुतळ्याच्या आडून कोणाचा तरी राजकीय किंवा सामाजिक डाव यशस्वी होऊ देऊ नये, असा महत्त्वाचा संदेश दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, अंजनगाव पुतळा प्रकरणी कोणतीही भडक प्रतिक्रिया दिल्याने तणाव अधिक वाढू शकतो आणि त्यामुळे समाजात गैरसमज पसरू शकतात. त्यामुळे धनगर आणि मराठा समाजाने समजून शांततेत राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुतळा समस्येवर संवादातून मैत्रीपूर्ण तोडगा काढण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, “आपण एकत्र बसून शांततेत तोडगा काढू. पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला कोण तोडतंय का? असा कोणाचा डाव आहे का, यावर मराठा आणि धनगर समाजाने लक्ष ठेवले पाहिजे.” जरांगेंच्या या आवाहनामुळे स्थानिक समाजात शांतता कायम ठेवण्याचा संदेश मिळाला आहे आणि राजकीय तथा सामाजिक Manoj Jarange Patil नेत्यांकडूनही तणाव न वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अंजनगावमधील खेळोबा मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी संबंधित वाद सामाजिक आणि राजकीय वर्तुळात गंभीर चर्चेचा विषय बनला आहे. मनोज जराणगे यांच्या शांततेच्या आवाहनामुळे या प्रकरणावर जनमानसात शांतता राखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.