सीआरपीएफच्या हवालदाराचा खून

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
- मुलीवरील एकर्ती प्रेमातून घडले हत्याकांड
- खून करणाऱ्या भावंडासह आईला अटक

अनिल कांबळे
नागपूर, 
Murder of CRPF constable दहाव्या वर्गात शिकणाèया मुलीवर शेजारी राहणाèया युवकाचे एकर्ती प्रेम हाेते. ती बाब वडिलाला कळताच त्या युवकाला जाब विचारुन मारहाण केली. त्यानंतर त्या युवकाने आई व माेठ्या भावासह मुलीचे वडिल आणि तिच्या मामावर हल्ला केला. यामध्ये मुलीच्या वडिलाचा मृत्यू झाला तर मामा गंभीर जखमी आहे. हे हत्याकांड गुरुवारी रात्री अकरा वाजता एमआयडीसी परिसरात घडले. पंकज रणजीतसिंह ठाकूर (42, माताेश्रीनगर) असे खून झालेल्या एसआरपीएफमधील हवालदाराचे नाव आहे. तर त्यांचे मेहुणे अर्पितसिंह अंजनी सेंगर (30) यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांना अटक केली.
 
 
Pankaj Thakur
 
Murder of CRPF constable  पाेलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पंकज ठाकूर हे सीआरपीएफमध्ये पाेलिस हवालदार असून त्यांची मुलगी दहावीत शिकते. मुख्य आराेपी आकाश हरिदास मंडल (23) याची मागील काही महिन्यांपासून पंकज ठाकूर यांच्या 15 वर्षीय मुलीशी मैत्री हाेती. दाेघांचे बाेलणे ठाकूर यांना आवडत नव्हते. या मैत्रीला ठाकूर यांनी कडाडून विराेध केला हाेता. अनेक वेळा समज देऊनही आकाश मैत्री ताेडत नसल्याने घरात तणावाचे वातावरण हाेते. यादरम्यान, आकाशचे तिच्यावर एकर्ती प्रेम जडले. तेव्हापासून ताे तिची मनधरणी करीत हाेता. मात्र, तिचा प्रेमास विराेध हाेता. गुरुवारी रात्री परिसरातील मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू हाेता. या गर्दीत आकाश पुन्हा त्या मुलीशी बाेलताना पंकज ठाकूर यांच्या नजरेस पडला. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आकाशला तेथून निघून जाण्यास सांगितले. दाेघांमध्ये जाेरदार वाद झाला. त्याला दाेन कानशिलात लगावल्या. या घटनेनंतर आकाश तेथून निघून गेला.
भाऊ-आईसह पुन्हा परतला
आकाशने घरी गेल्यानंतर माेठा भाऊ हर्षित हरदास मंडळ (26) आणि पाेलिस दलात कार्यरत असलेली आई पुष्पा मंडळ (46) यांना घडलेला प्रकार सांगितला. काही वेळातच ताे भाऊ आणि आईसह शस्त्र घेऊन परत आला. सर्वांच्या हातात लाेखंडी सळई व काही धारदार शस्त्रे हाेती. ठाकूर आणि मंडळ कुटुंबियांमध्ये वाद झाला. त्यानंतर मुख्य आराेपी आकाशने लाेखंडी सळई ठाकूर यांच्या छातीत खुपसून त्यांची हत्या केली. अर्पितसिंह यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात अर्पितसिंह गंभीर जखमी झाला.
 
 
तीनही आराेपींना अटक
सदर प्रकरणात एमआयडीसी पाेलिसांनी मुख्य आराेपी आकाश मंडल, त्याचा भाऊ हर्षित आणि आई पुष्पा मंडळ यांना अटक केली. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून पाेलिसांकडून पुरावे गाेळा करण्यात येत आहे. न्यायालयाने तीनही आराेपींना साेमवारपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.