वर्धा जंशनला नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एसप्रेसचा थांबा मंजूर

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
माजी खासदार रामदास तडस यांची माहिती
 
 
वर्धा, 
Nagpur Duronto Express halt approved वर्धा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी निर्णय घेत, नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एसप्रेस या सुपरफास्ट रेल्वे गाडीला वर्धा जंशन येथे नव्याने थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाकडून २७ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर मंजूर करण्यात आला असून, लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती माजी खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिली.
 

Ramdas 
 
Nagpur Duronto Express halt approved  वर्धा लोकसभा क्षेत्रात वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, सेवाग्राम, सिंदी रेल्वे, वरुड, मोर्शी या ठिकाणी विविध गांड्यांचे थांबे मिळावे, तसेच वर्धा येथे नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एसप्रेस तसेच हावडा-पुणे दुरांतो एसप्रेसचा थांबा मिळावा यासाठी आपण खासदार असताना नियम ३७७, शून्य काल या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून, तसेच रेल्वे मंत्री, रेल्वे अध्यक्ष, महाप्रंबधंक यांना पत्र पाठवून बैठकीमध्ये मुद्दे उपस्थित केले होते. आता सुद्धा या संदर्भात पत्र व्यवहार करीत असून याबाबतचा पाठपुरावा झेडआरयुसीसी सदस्य प्रणव जोशी यांनी सुद्धा याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण थांबे मंजूर झाले आहे. नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एसप्रेस या सुपरफास्ट रेल्वे गाडीला वर्धा जंशन थांबा मिळाल्यामुळे वर्धा जिल्ह्यासह परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मुंबई-नागपूर दरम्यान जलद व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी या गाडीला वर्धा येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना इतर स्थानकांवर जावे लागत होते. आता वर्धा जंशनवर थेट थांबा मिळाल्याने प्रवाशांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत होणार असल्याचे यावेळी माजी खासदार रामदास तडस म्हणाले.