पांढरकवडा,
National Kabaddi Championship पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे 2 ते 4 एप्रिल दरम्यान होत असलेल्या 35 व्या राष्ट्रीय कबड्डी सब ज्युनिअर स्पर्धेसाठी येथील मित्र क्रीडा मंडळाच्या तीन मुलींची विदर्भ संघात निवड करण्यात आली आहे. खुशी संजय मडावी, जान्हवी संजय कन्नलवार व अनुष्का सुनील जाधव यांची विदर्भ संघात निवड करण्यात आली असून यातील खुशी मडावी विदर्भ संघाची कर्णधारसुद्धा आहे. मित्र क्रीडा मंडळ सात दशकांपासून कबड्डी, खो-खो व कुस्तीचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करत आहे. या मंडळाच्या वतीने प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासह त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीसुद्धा प्रयत्न करण्यात येतो.
National Kabaddi Championship मित्र क्रीडा मंडळाच्या अनेक खेळाडूंची दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होत असते. कबड्डीसाठी निवड झालेल्या खुशी मडावी, जान्हवी कन्नलवार, अनुष्का जाधव ह्या खो-खोच्यासुद्धा राष्ट्रीय खेळाडू आहेत हे विशेष. या खेळाडूंनी आपल्या निवडीचे श्रेय विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, उपाध्यक्ष प्रफुल देशमुख, सचिव प्रदीपसिंह ठाकूर, मित्र क्रीडा मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष गोपाळ बिसेटवार, अध्यक्ष मदन जिड्डेवार, सचिव सुनील कोपुलवार, संचालक गणपत डोंगरे, अशोक कुमरे यांना दिले आहे. या खेळाडूंना मंडळाचे प्रशिक्षक रवी दर्शनवार यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांचे राम कुमरे, ओमेश दर्शनवार, संजय औदार्य, राम जिड्डेवार, अजय कुमरे, आशुतोष जाधव, धीरज रेड्डीवार, सौरभ बेले, सुविधी कोपुलवार यांनी अभिनंदन केले आहे.