वाघोबा.... कैसे उल्लू बनाया!

वाघोबा आणि मनुष्याच्या आड येतेय मुखवट्याचे कवच! दोन वर्षात पवनी वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एकही मृत्यू नाही

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
भंडारा.
No tiger attack death in Pawani forest  बरेचदा बदललेली मानसिकता हेही समस्येवरील रामबाण उपाय ठरू शकतो! वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने हे हेरले... चक्क वाघोबाची मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी, जंगलात वावरणाऱ्या मनुष्याच्या डोक्यावर मागच्या भागाला मानवी मुखवटे लावलेआणि परिणाम स्वरूप या भागातील वाघाच्या हल्ल्यातील मागील दोन वर्षात शून्य झाले! वाघ आणि मनुष्य यांच्यामध्ये मुखवटे आले, आणि याच मुखवट्यांनी वाघाची मानसिकता बदलली. भंडारा वन विभागातील पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत सुरू असलेला हा प्रयोग आज पवनी मॉडेल म्हणून वन विभागाच्या नागपूर परीक्षेत्रात आपले वेगळेपण जपून आहे. या प्रयोगाने वाघोबाला उल्लू बनविले, हेच खरे!
 
 
 
pawani
 
 
केवळ समस्यांचे रडगाणे गात बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी हालचाली झाल्या तर सकारात्मक परिणाम दिसतात हे तेवढेच खरे! याचीच प्रचिती पवनी वनपरिक्षेत्रात सध्या येत आहे. उन्हाळ्यात मोह फुल वेचण्यासाठी गेलेल्या लोकांवर वाघाचे होणारे खाल्ले, आणि त्यात जाणारे लोकांचे जीव तेवढीच गंभीर समस्या होती. दोन वर्षांपूर्वीपर्यंत मोहफुलाच्या या हंगामा दोन ते तीन जणांचा बळी जायचा. यावर एक आगळी वेगळी युक्ती लढविण्याचा निर्णय वनपरिक्षेत्राधिकारी वृषाली नागदिवे यांनी घेतला आणि त्याला वाघोबांनी प्रतिसादही दिला. पश्चिम बंगाल राज्यात असलेल्या सुंदरबन येथे मध वेचण्यासाठी जाणारे लोक वाघाच्या हल्ल्यातून बचावासाठी डोक्याच्या मागे मानवी मुखवटे लावून जंगलात जातात. ही आयडिया प्रयोगशील असलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी नागदेव यांनी हेरली. एक मानवी मुखवटा आणि मेघा फोन असे साहित्य वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आणि मोहफुल हंगामात जंगलात जाणाऱ्या गावांमधील नागरिकांना दिले. पवनी वनपरिक्षेत्र उमरेड कराडला अभयारण्याचा बफर झोन असल्याने वाघांची संख्या आणि बाबत बराच आहे. अशावेळी एक ते दीड हजार यावर्षी 700 आसपास मुखवटे वनविभागाने वाटले.
 
 
वाघ नेहमी मागून हल्ला करतो. मोहफुल वेचताना माणूस खाली वाकून काम करतो. तो प्राणी आहे आणि आपली शिकार आहे असा समजवून वाघ त्याच्यावर हल्ला करतो. हीच वाघाची मानसिकता बदलण्यासाठी हे मुखवटे मनुष्याच्या डोक्याला मागच्या भागाला लावून जंगलात वावरण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मुखवटा पाहून वाघ भ्रमात पडतो आणि शिकारीची मानसिकता बदलली जाते. दोन वर्षात मोहफुल वेचताना वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याची एकही घटना घडली नसल्याचे समजते. एकूणच काय तर एक साधा मुखवटा वाघोबाला उल्लू बनवून लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्रभावी ठरत आहे. पवनी वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी वृषाली नागदिवे यांनी राबविलेला हा उपक्रम मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कोंबड्या, बकऱ्या जंगलात सोडून वाघाला थांबविण्याच्या उपाययोजना करताना आपल्या कल्पनांचा अनाकलनीय विस्तार करण्यापेक्षा, मुखवट्याचा हा साधा प्रयोग नक्कीच महत्त्वाचा वाटतो. आज नागपूर वनपरिक्षेत्रात पवनीचा हा प्रयोग पवनी मॉडेल म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
 
 
 
माणूस आणि प्राणी यांच्या वर्तनावर काम : नागदेवे
माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कायम चर्चेत असतो मात्र माणूस आणि प्राणी यांच्या दोघांच्याही वर्तणुकीवर काम झाल्यास मार्ग निघू शकतो. मुखवट्याचा प्रयोग वाघाची मानसिकता बदलण्यास उपयोगी ठरत आहे, सोबतच जंगलात जाणाऱ्या नागरिकांची जनजागृती करून त्यांच्या वर्तणुकीत बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मेगा फोन, समूहाने जाणे या सूचना आम्ही देतो. जनजागृतीसाठी जिंगल आणि रिल्स आम्ही केले आहेत. मोह फुलाचा हंगाम संपेपर्यंत सातत्याने गावागावात आणि जंगलात जनजागृतीसाठी आमचे पथक कार्यरत असते. मागील दोन वर्षात त्याचे सकारात्मक परिणाम दिसल्याची प्रतिक्रिया पवनीच्या वनपरिक्षेत्राधिकारी वृषाली नागदेवे यांनी तभाशी बोलताना दिली.
....