पुलगावच्या कुख्यात गुंडाची अकोला कारागृहात रवानगी

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
वर्धा :
notorious gangster of Pulgaon पुलगाव येथील कुख्यात गुंड व दारू विक्रेता पवन कातरे (२९) रा. गुंजखेडा याच्यावर एम. पी. डी. ए. कायद्यांतर्गत कारवाई करून अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली. कुख्यात गुंड व दारूविक्रेता पवन कातरे याच्या विरुद्ध २०१८ पासून १२ गुन्हे नोंद आहे. यामध्ये शिवीगाळ, दुखापत, शिवीगाळ करणे, दारूची विक्री करणे, खंडणी मागणे आदी गुन्हे नोंद आहेत.
 
 
Pulgaon
 
notorious gangster of Pulgaon  मागील ७ वर्षांपासून स्थानबद्ध इसम पवन कातने पुलगाव परिसरात जनसामान्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली होती. त्यामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होवून सार्वजनिक जिवन विस्कळीत झाले होते. त्याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी वान्मथी सी. यांना पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्फतीने सादर केला होता. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यांनी स्थानबद्ध आदेश जारी केल्याने त्याची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली.