पाकिस्तानात पेट्रोल ₹४५८, डिझेल ₹५२० पार

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Petrol in Pakistan is ₹458 मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही बसू लागला असून इंधन दरात अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ जाहीर केली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
petrol
 
पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी ही दरवाढ जाहीर करताना सांगितले की, मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलटंचाई निर्माण झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम पाकिस्तानवर होत आहे. नव्या दरांनुसार पेट्रोलचा दर प्रति लिटर सुमारे ४५८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर डिझेलची किंमत तब्बल ५२० रुपयांच्या आसपास गेली आहे. एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आल्याने जनतेत नाराजी वाढत आहे.
 
सरकारच्या आकडेवारीनुसार, डिझेलच्या किमतीत पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर पेट्रोलचे दरही चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सरकारचे म्हणणे आहे.दरम्यान, वाढत्या दरांचा भार काही प्रमाणात कमी करण्यासाठी सरकारने दुचाकी वापरकर्त्यांना मर्यादित कालावधीसाठी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. ठराविक प्रमाणात इंधनावर सवलत देऊन सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.