कोल्हापूर,
phaltan-female-doctor-suicide-case : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात तुरुंगात असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने जामिनावर सोडण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, यामुळे तो तुरुंगाबाहेर येणार आहे.
फलटणमधील एका हॉटेलच्या खोलीत या महिला डॉक्टरने गळफास घेऊन स्वतःचा जीव संपवला होता. मृत्यूपूर्वी तिने आपल्या हातावर PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहिली होती. तपासानंतर पोलिसांनी दोघांवर महिला डॉक्टरचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप ठेवत अटक केली होती.
गोपाळ बदने मागील पाच महिन्यांपासून तुरुंगात होता. जामीन मिळवण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता आणि सुनावणीअंती न्यायालयाने त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यामुळे या प्रकरणात आरोपी पोलीस उपनिरीक्षक तुरुंगाबाहेर येणार असून, पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे.