सुदैवाने जीवितहानी टळली
मालेगाव,
Pickup vehicle accident बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर शुक्रवारी ३ एप्रिल पिकअप वाहनाचा अपघात होऊन वाहन पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप क्रमांक एमएच. २० ईजी. ८९३७ हे वाहन मुंबईहून अमरावतीकडे सफरचंद घेऊन जात असताना नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्र. २३८/७००, मालेगाव टर्मिनलजवळ सकाळी ११:४० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
Pickup vehicle accident वाहनाचे मागील दोन्ही टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या मधोमध १०० व १२० किमी लेनमध्ये पलटी झाले. या अपघातात चालक अशपाक शेख रा. संभाजीनगर व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीस कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक अमाणीचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन दांदडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बॅरिकेडिंग करून सुरक्षिततेची उपाययोजना केली.अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, सध्या ८० किमी लेनवरून वाहतूक सुरळीत सुरू असून पुढील कारवाई सुरू आहे.