दोन संघटना एकमेकांसमोर
यवतमाळ,
Police Boys Competition शहरात ‘पोलिस बॉईज संघटना’ आयोजित करत असलेली राज्यस्तर हॉकी स्पर्धा वादाच्या भोवèयात सापडली आहे. ही स्पर्धा ‘हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ’ची कोणतीही परवानगी न घेता आयोजित केली जात असून, ती पूर्णपणे बेकायदेशीर मानली जात आहे. या स्पर्धेत सहभागी होणाèया संघ आणि खेळाडूंवर राज्य संघटनेमार्फत कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाण्याचा इशारा जिल्हा संघटनेने दिला आहे. क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ऑलिम्पिकमधील खेळांचे महत्त्व जपण्यासाठी ‘एक राज्य : एक संघटना’ हे धोरण राबवले जात आहे. याच नियमानुसार 2019 मध्ये ‘विदर्भ हॉकी असोसिएशन’ची मान्यता खारीज करण्यात आली असून सध्या ‘हॉकी इंडिया’च्या अधिकृत पोर्टलवर विदर्भाचे नाव कुठेही नाही. असे असूनही, काही लोक विदर्भाची मान्यता अद्याप असल्याचे भासवून खेळाडूंची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात खेळाडू व पालकांकडून पैसे उकळण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात हायकोर्टाचा निकालही ‘एक राज्य : एक संघटना’ याच बाजूने लागलेला असतानाही खेळाडूंच्या भविष्याशी खेळ सुरू आहे.
Police Boys Competition हॉकीच्या नियमानुसार कोणत्याही स्पर्धेला अधिकृत मानण्यासाठी एक ठरावीक कायदेशीर साखळी पाळणे अनिवार्य असते. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर एफआयएचकडून हॉकी इंडियाला परवानगी घ्यावी लागते आणि हॉकी इंडियाची मान्यता हॉकी महाराष्ट्राला असते, त्याचप्रमाणे हॉकी महाराष्ट्रची अधिकृत संलग्नता लाभलेल्या हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळची परवानगी घेणे जिल्ह्यात होणाèया कोणत्याही हॉकी स्पर्धेसाठी अनिवार्य आहे. या अधिकृत परवानगीशिवाय आयोजित होणारी कोणतीही स्पर्धा कायदेशीर ठरू शकत नाही, हे जिल्हा संघटनेने स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत चालणाèया एका केंद्राचे प्रशिक्षक हे स्वतः या अनधिकृत स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. स्पर्धेच्या बॅनरवर त्यांचे नाव असून, सरकारी पदावर असलेल्या आणि लीगल बाबींची जाण असलेल्या व्यक्तीनेच अशा बेकायदेशीर स्पर्धेत सहभागी होणे, हे क्रीडा विभागाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन मानले जात आहे. या प्रकारामुळे खेळाडूंच्या भविष्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त प्रशिक्षकावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत काही कारवाई होईल का, यावर सर्वांचे लक्ष आहे.
संघटनेची विनाकारण बदनामी
पोलिस बॉईज संघटना ही एक स्वतंत्र सामाजिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत संस्था असून, विविध क्षेत्रात सातत्याने कार्य करत आहे. संघटनेची विनाकारण बदनामी करण्यात येत आहे. आर्थिक मदत घेतल्याचे व स्पर्धा अनाधिकृत असल्याचे खोटे आरोप करून बदनामी केल्या जात आहे. या आरोपामध्ये कोणते तथ्य नाही.
अतिक शेख
अध्यक्ष, पोलिस बाँईज संघटना