आर्णी,
Pradeep Mishra शिवभक्तांसाठी येथील शिवमहापुराण कथा एक पर्वणीच ठरली आहे. राज्यभरातील शिवभक्त सिद्धेश्वरनगरीत एकवटले आहेत. गुरुवार, 2 एप्रिलला कथेच्या चौथ्या दिवशी पोहरागडचे बंजारा समाजाचे धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज, व्यसनमुक्तीसम्राट मधुकर खोडे महाराज, आर्णी नगर परिषद अध्यक्ष नालंदा भरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार, पूजा मुनगिनवार, गोपाल कोठारी, पवन पनपालिया, एनटी जाधव, शंकर मारबते, दीपक चिंतावारांसह शिवभक्त जनसागर उपस्थित होता.
Pradeep Mishra शिवमहापुराण कथा समजावून सांगताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले, शिव महादेवाची आराधना सर्वश्रेष्ठ असून ती केव्हाही, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत केली तरी सिद्ध होते. शिव आराधनेमुळे मानवी मनाला शांतता लाभते,आपल्या हातुन पुण्य कर्म घडते, वाईट विचार मनातून नष्ट होतात. सत्याचा मार्ग स्वीकारतो. निस्वार्थ सेवा करणाèयांना महादेवाचा आशीर्वाद मिळतो. महादेव माणसातील दोष बघत नाही तर त्याच्या गुणांची पारख करतो. त्यामुळे चांगले कर्मच आपल्या आयुष्यातील आनंद द्विगुणित करू शकतेे, असे ते म्हणाले. जीवनातील समस्या सोडविण्यासाठी शिव उपासना हाच एक मार्ग असल्याचे त्यांनी विविध उदाहरणे व लोकांना आलेल्या अनुभवपत्रांचे वाचन करून सांगितले. दुपारी 4 वाजता शिव आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.