सुरक्षेची उणीव ठरली जीवघेणी : युवकाचा मृत्यू

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
पुणे
bulldozer operator death हवेली तालुक्यातील वरदाडे येथील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुलाचे काम सुरू असताना एका २२ वर्षीय ऑपरेटरचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. मृतकाचे नाव विजय कुमार (वय २२, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असून, तो रिंगरोडच्या कामावर बुलडोझर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.
 

bulldozer operator death  
घटनेनुसार, विजय कुमार पुलाच्या कामासाठी आपला बुलडोझर चालवत असताना अचानक शिडीवरून त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीपात्रातील खोल पाण्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरु केले, परंतु दुर्दैवाने त्याचा जीव वाचवता आला नाही.प्राथमिक तपासात ही घटना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे घडली bulldozer operator death  असल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काम करत असताना विजय कुमारने कोणतेही लाईफ जॅकेट किंवा इतर सुरक्षात्मक साधने वापरले नव्हते. तसेच, कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेली सुरक्षितता साधने उपलब्ध नसल्याचे किंवा वापरली जात नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.विजय कुमार पुण्यात कामासाठी वास्तव्यास होता. त्याच्या अकस्मात निधनामुळे उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंदवली असून, संबंधित कंत्राटदाराकडून सुरक्षेचे नियम पाळले जात होते का, याचा तपास हवेली पोलीस करत आहेत.